शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या गर्दीने फुलला लोणावळा, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:18 IST

पर्यटन व थंड हवेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.

लोणावळा : पर्यटन व थंड हवेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील इंग्रजी शाळांना ख्रिसमसची सुटी पडली आहे. या सुटीचा आनंद घेण्याकरिता व थर्टी फर्स्ट, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीकरिता लोणावळा व खंडाळा शहरात पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवडाभर ती कायम राहणार आहे.मंगळवारी ख्रिसमसनिमित्त लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे व कर्मचारी वाहतूक नियोजनाकरिता मुख्य चौकांमध्ये कार्यरत होते. पुण्याकडे जाणाºया वाहनांकरिता अंबरवाडी गणपती मंदिर मार्गाकडून इंदिरानगर, तुंगार्लीमार्गे शहराबाहेर जाणाºया पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या वाहनचालकांना शहरात जायचे नाही त्यांनी वाहतूककोंडी टाळत या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले होते.छुप्या पद्धतीने हुक्काविक्रीलायन्स पॉइंट हे ठिकाण सायंकाळी सातनंतर पर्यटकांकरिता बंद करण्यात येते. त्यानंतर पॉइंटचे दोन्ही गेट बंद केले जातात. असे असताना काही युवक हे रस्त्याकडेला उभे राहत रात्रीच्या वेळी येणाºया पर्यटकांच्या वाहनांना थांबवून दारू, हुक्का हवाय का, असे विचारत छुप्या पद्धतीने हुक्काविक्री करीत आहेत. राज्यात हुक्काबंदी करण्यात आल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी अनेक वेळा या ठिकाणी अचानक छापा टाकत हुक्का व हुक्क्याची भांडी दरीत फेकून दिली आहेत. त्यानंतर या परिसरातील खुलेआम हुक्काविक्री बंद झाली असली, तरी काही मंडळी आजही छुप्या पद्धतीने हुक्काविक्री करीत आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनPuneपुणे