शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:44 IST

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला..

वेल्हे : तालुक्यातील राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यापासून बचाव करताना एका पर्यटकाचा सुवेळा माचीवरून १ हजार ५०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली़. ही घटना रविवारी (दि़ २९) सायंकाळी घडली़ सुजय भगवान मांडवकर (वय २०, रा़ बोरघर, ता. खेड, जि़ रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : सुजय मांडवकर आपल्या चार ते पाच मित्रांसमवेत राजगडावर पर्यटनासाठी आला होता. गड फिरून झाल्यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व जण सुवेळा माचीजवळ आले असता आग्यामोहोळाने हल्ला केला. यावेळी हे सर्व जण जिकडे मिळेल तिकडे पळू लागले. त्यावेळी सुजय सुवेळा माचीच्या तीन खांबिटका या कड्यावरून १५०० फूट खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने सुजय याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. ........पर्यटक गडाच्या तटाच्या खालच्या बाजूने गडाला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रस्ते माहीत नसल्याने नव्या पाऊलवाटा तयार करून प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी तटाखाली असणारे आग्या मोहोळ जागे होते़. तसेच काही पर्यटक अंगावर सुगंधी अत्तर लावून आलेले असतात. त्यामुळे या मधमाशा पर्यटकांवर हल्ला करतात, असे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख विलास वाहने यांनी सांगितले. 

टॅग्स :bhor-acभोरDeathमृत्यूFortगड