भीमा-पाटसच्या अध्यक्षपदी कुल

By Admin | Updated: June 6, 2015 22:18 IST2015-06-06T22:18:27+5:302015-06-06T22:18:27+5:30

पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बारवकर

The total of the President of Bhima-Patas | भीमा-पाटसच्या अध्यक्षपदी कुल

भीमा-पाटसच्या अध्यक्षपदी कुल

वासुंदे : पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बारवकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
या वेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व सदस्य यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक, सभासद, कामगार व हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राहुल कुल व नामदेव बारवकर यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. मधुकाका शितोळे यांच्या कारखाना कार्यस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भीमा-पाटस कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कुल यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर एक हाती विजय मिळवला होता. तर विरोधी पॅनलचे प्रमुख व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील भीमा बचाव सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.
आज शनिवारी (दि. ६) १० च्या सुमारास कारखान्याच्या सभागृहामध्ये अध्यक्ष व उपाध्यपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंड-पुरंदर विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये अपेक्षेप्रमाणे आमदार राहुल कुल यांची सलग चौथ्यांदा कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: The total of the President of Bhima-Patas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.