पुण्यात कन्हैयाच्या सभेला तुफान गर्दी, कडेकोट बंदोबस्त

By Admin | Updated: April 24, 2016 16:52 IST2016-04-24T16:49:36+5:302016-04-24T16:52:48+5:30

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैया कुमारची सभा थोड्याच वेळात सुरु होणार असून तो पुण्यात दाखल झाला आहे.

Tornado crowds in the Kanhaiya rally in Pune | पुण्यात कन्हैयाच्या सभेला तुफान गर्दी, कडेकोट बंदोबस्त

पुण्यात कन्हैयाच्या सभेला तुफान गर्दी, कडेकोट बंदोबस्त

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २४ - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर आज  मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्याची सभा थोड्याच वेळात सुरु होणार असून तो पुण्यात दाखल झाला आहे. 
 
अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला आहे. 40-50 गाड्यांच्या ताफ्यासह तो मुंबईहून पुण्यात दाखल झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तुफान गर्दी असून,  पास असलेल्या व्यक्तींनाच सभेला  प्रवेश देण्यात येत आहे.  परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. 
 
बालगंधर्व रंगमंदिरातील कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अमोल पालेकर, संध्या गोखले , बाबा आढाव, सिद्धार्थ धेंडे, मुक्ता मनोहर , किरण मोघे संदीप बर्वे उपस्थित आहेत. पासशिवाय प्रवेश मिळत नसल्यामुळे बालगंधर्व च्या गेटवर तरूणांची घोषणाबाजी सुरु आहे. 
 

Web Title: Tornado crowds in the Kanhaiya rally in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.