शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोड पदार्थांच्या अतिसेवनाने तरुणाला अर्धांगवायूचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:40 IST

दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली.

ठळक मुद्देदिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे.निलेश राळे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली. निलेश हायपोकॅलेमिक पीरिऑडीक पॅरालिसिस या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामध्ये गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते.

पुणे - दिवाळीत जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांग वायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली. निलेश हायपोकॅलेमिक पीरिऑडीक पॅरालिसिस या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामध्ये गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. मात्र निलेशला त्याची गोड खाण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे त्याला अर्धांग वायूचा झटका आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिले आहे. 

निलेश 7 नोव्हेंबर रोजी बहिणीला घरी सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर गाडी चालवताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. अशक्तपणा आल्याचे वाटत असताना स्नायूंची हालचाल बंद झाली. मात्र शरीरात नेमकं काय होत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. उपचारासाठी त्याने एका रुग्णालयाजवळ गाडी थांबवली. मात्र त्या रुग्णालयात योग्य सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला. 

साईनाथ रुग्णालयात निलेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र एक्सरे आणि एमआरआयमध्ये देखील त्याच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही. त्यानंतर 12 तास निलेशला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी निलेशला जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयामध्ये निलेशच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आले. दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने रक्तातील पोटॅशियम कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीdocterडॉक्टर