उद्या धान्य-रॉकेल परवानाधारकांचा मोर्चा
By Admin | Updated: February 2, 2015 02:24 IST2015-02-02T02:24:28+5:302015-02-02T02:24:28+5:30
भोर तालुक्यातील सर्व धान्य व रॉकेल परवानाधारक, रेशनिंग कृती समिती ग्राहक पंचायत भोर या संघटनांकडून उद्या मंगळवार (दि. ३) रोजी

उद्या धान्य-रॉकेल परवानाधारकांचा मोर्चा
नेरे : भोर तालुक्यातील सर्व धान्य व रॉकेल परवानाधारक, रेशनिंग कृती समिती ग्राहक पंचायत भोर या संघटनांकडून उद्या मंगळवार (दि. ३) रोजी विविध मागण्यांसाठी चौपाटी शिवाजी पुतळ्यापासून मंगळवार पेठमार्गे तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून रेशनिंगचे धान्य व रॉकेल लाभधारक व रेशनिंग दुकानदार यांनी मागणीप्रमाणे धान्य व रॉकेल कोटा मिळत नाही. त्यामुळे रेशनिंग दुकानदार व कार्डधारक यांचे वादविवाद होत आहेत.
रॉकेल कोटा हा एकूण कोट्याच्या केवळ २० टक्के इतकाच मंजूर करण्यात आल्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. धान्य दुकानदारांना दिले जाणारे भाडे मागील १५ वर्षापासून तेच आहे. ते वाढवून मिळावे, दुकानदारांना
दुकान पोच माल मिळावा, रॉकेलचे कमिशन वाढवून मिळावे, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.
यावर शासनाने गांभीर्याने विचार करुन परवानाधारकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे विठ्ठल करंजे (अध्यक्ष रेशनिंग कृती समिती भोर), सोमनाथ वचकल (अध्यक्ष रेशन व केरोसिन परवानाधारक संघटना, भोर), जमीर आतार (अध्यक्ष, ग्राहक पंचायत), अनिल गिरे (संघटक, ग्राहक पंचायत) यांच्याकडून सांगण्यात आले.