जीवनावश्यक वगळता इतर दुकाने उघडण्याबाबत उद्या निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:07+5:302021-04-11T04:11:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची बैठक ...

जीवनावश्यक वगळता इतर दुकाने उघडण्याबाबत उद्या निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची बैठक होणार आहे. व्यापाऱ्यांना परिस्थिती समजावून सांगितली जाईल. त्यांनरतच दुकानांबाबतची भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोरोना उपाययोजनेबाबत आढावा घेण्यासाठी पवार यांनी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
पवार म्हणाले, व्यापाऱ्यांची सोशल मीडियावर वेगवेगळी वक्तव्ये पाहण्यात आली. रविवारी व्यापारी संघटनाच्या प्रमुखांशी अधिकारी चर्चा करणार आहेत. त्यांना सगळी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली जाईल. त्यांच्याही सहकार्याची गरज कशी आहे हे त्यांना समजावून सांगण्यात येईल. माझा अनुभव असा आहे की एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य व्यापारी संघटनांच्या लक्षात आणून दिले तर ते प्रतिसाद देतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
पवार म्हणाले, मलाही कळतंय की केले अनेक दिवस हे काम सुरु आहे. सहनशीलता संपतेय. पण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. पूर्वी कोरोना सगळ्यांना होत नव्हता. प्रसार कमी होता, आता तो कुटुंबातल्या सगळ्यांना होतो. लस घेतल्यावर पॉझिटिव्ह आले तरी त्रास कमी होतो. ससून हॅास्पिटलमध्ये ५०० बेडपर्यंत क्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. ससूनला ॲाक्सिजनसाठी ॲटलस कॉपको मशिन दिले आहे. लष्करातील रुग्णालयांबाबत
चौकट
एकमेंकांवर टीका व राजकारण न करता काम करावे : पवार
अजित पवार म्हणाले, एकमेकांवर टीका व राजकारण न करता प्रत्येकाने आपापले काम करावे. केंद्राने हे केले नाही असे आम्ही म्हणायचे आणि केंद्राने म्हणायचे आम्ही सगळे दिले आहे. आता एकमेंकावर टीका व राजकारण न करता काम करावे. लसीच्या बाबतीत एक लाखाचे टार्गेट ठेवले होते. ८५,००० लसीकरण केले. मात्र लस कमी पडली. आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की, जितकी लस आवश्यक असेल तितकी मिळेल. केंद्र सरकारतर्फे आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.