टोमॅटो, गवार, कारले, भेंडी तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2015 00:19 IST2015-12-09T00:19:43+5:302015-12-09T00:19:43+5:30
दौंडला टोमॅटो, गवार, कारले, भेंडी, दोडका मेथी यांच्या बाजारभावात वाढ झाली असून वांगी, लिंबू, मिरची यांचे दर स्थिर आहेत

टोमॅटो, गवार, कारले, भेंडी तेजीत
दौंड : दौंडला टोमॅटो, गवार, कारले, भेंडी, दोडका मेथी यांच्या बाजारभावात वाढ झाली असून वांगी, लिंबू, मिरची यांचे दर स्थिर आहेत. तसेच, भुसार मालाची आवक स्थिर झाली आहे. बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती ज्ञानदेव चव्हाण आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१८५) १६५० ते २०५१, ज्वारी (५) २३०० ते ३०३०, बाजरी (१०) १४५० ते १९००, मका (७५) १४३१ ते १५५१, लिंबू (१०६) ३३०-६०१.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४५९) १६०० ते २०५०, ज्वारी (६०५) १६०० ते २८५०, बाजरी (१०५) ४२०० ते ५००१, हरभरा (३१) ४२०० ते ५००१, मका (८५) १४०० ते १६५०, लिंबू (१४६) ४००-६३६.
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४०) १६०० ते २०११, ज्वारी (२) १५५१ ते २०००, बाजरी (४७) १३०० ते १९११, मका (८५) १४०० ते १६५०.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (४०) १६०० ते २०११, ज्वारी (२) १५५१ ते २२००, बाजरी (४७) १३०० ते १९११, हरभरा (२) ३७०० ते ४४५१, मका (१८) १४४१ ते १६२१.