टोमॅटोचे भाव तेजीत; तर वांग्याच्या दरात घसरण

By Admin | Updated: September 30, 2015 01:17 IST2015-09-30T01:17:55+5:302015-09-30T01:17:55+5:30

तालुक्यात टोमॅटोची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. वांग्याची आवक वाढून बाजारभावात घसरण झाली. मिरची, कोथिंबीर व मेथी यांचे दर स्थिर राहिले

Tomato prices rise; Falling at the price of brinjal | टोमॅटोचे भाव तेजीत; तर वांग्याच्या दरात घसरण

टोमॅटोचे भाव तेजीत; तर वांग्याच्या दरात घसरण

दौंड : तालुक्यात टोमॅटोची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. वांग्याची आवक वाढून बाजारभावात घसरण झाली. मिरची, कोथिंबीर व मेथी यांचे दर स्थिर राहिले. तसेच, लिंबू, कारली, भेंडी, दोडका यांचे बाजारभाव तेजीत निघाले. अशी माहिती सभापती ज्ञानदेव चव्हाण यांनी दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक व भाव १० किलोंप्रमाणे - टोमॅटो (३०) ७०-१२०, वांगी (२८) ५०-११०, दोडका (१५) १२०-२५०, भेंडी (१७) १००-२००, कार्ली (१७) १००-२००, हिरवी मिरची (३९) १२० ते ३५०, भोपळा (३२) २० ते ३५, काकडी (३१) ५० ते १००, कोथिंबीर (३,५४० जुड्या) १०० ते ५००, मेथी (२,१४० जुडी) १५०-५३०. (वार्ताहर)
--------
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२४५) १५५० ते १९००, ज्वारी (१४) १५०१ ते १६००, बाजरी (४२) १४७५ ते १७००, हरभरा (१) ४००० ते ४०००, मका (२) १५०० ते १६००, लिंबू (७५) ४००-८५०.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (८५३) १५५१ ते १९०१, ज्वारी (६०५) १६०० ते २४००, बाजरी (४६८) १३०० ते १८००, हरभरा (३१) ३८००ते ४७००, मका (२१) १५०० ते १७५१, मूग (१९) ७५०० ते ८५००, लिंबू (१३१) ४००-८०१.
ााटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१६९) १५०० ते १८००, ज्वारी (३५) १५९० ते २१११, बाजरी (१०२) १२७५ ते १६५१, हरभरा (११) ३६०० ते ४१०१, मका (१०) १३५१ ते १७२१.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१९०) १५०१ ते १९७५, ज्वारी (३३) १५९० ते १९५१, बाजरी (३०) १२६१ ते १९००, हरभरा (३) ३८५१ ते ४४००, लिंबू (६८) ६०० ते १२५०.

Web Title: Tomato prices rise; Falling at the price of brinjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.