शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 2:43 PM

पँडॅमिक मध्ये राज्य सरकारची भरीव अशी काय कामगिरी? भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल

ठळक मुद्दे रिक्षाचालक, कामगार वर्ग यांच्यासाठी जाहीर केलेले पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचले याचे सरकारने उत्तर द्यावे

पाषाण: कोरोना कालावधीमध्ये आरोग्याबरोबरच व्यवहाराचाही आर्थिक फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. राज्य सरकारकडून वैद्यकीय सुविधा आणि लसीकरण प्रश्न विचारले असता टोलवटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. केंद्राने मदत करूनही आघाडी सरकारकडून नुसता आरोप - प्रत्यारोपांचा खेळ चालू आहे. पँडॅमिक मध्ये राज्य सरकारने भरीव अशी काय कामगिरी केली. असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

तर ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी किती फी आकारावी याबाबत सरकारचे धोरण नाही. यामुळे शाळा विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये अडवणूक करून पालकांची लुट करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. बाणेर बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला कोवीड योद्ध्यांचा सन्मान तसेच महिला सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. 

"कोरोना मध्ये आरोग्याबरोबरच आर्थिक फटका देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे. सरकार पॅकेज जाहीर करत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये रिक्षाचालक घरगुती कामगार महिला यांना मदत झालेली नाही. २०१४ नंतर घरकाम करणाऱ्या कामगारांची नोंदणी झालेली नाही. तसेच जाहीर केलेले पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचले याचे उत्तरे सरकार देत नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

राज्य सरकारने धोरण ठरवणे आवश्यक होते

शाळेची फी हा कळीचा मुद्दा आहे. शालेय शिक्षण ऑनलाईन असताना शाळांनी किती फी आकारावी याबाबत राज्य सरकारने धोरण ठरवणे आवश्यक होते. हे देखील त्यांनी ठरवले नाही. शाळांमध्ये फी भरली न भरल्याने रिझल्ट दिले जात नाहीत. शाळांच्या मनमानी कारभाराचा विरोधात सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे. 

वीजबिल संदर्भात सरकारमधील मंत्री गप्पच 

पँडॅमिक मध्ये राज्य सरकारने भरीव अशी काय कामगिरी केली. तर हे सरकारला सांगता येणार नाही. डोमेस्टिक व्हायोलन्स मध्ये वाढ झाली आहे, तसेच पोलिस दलातील महिला देखील सुरक्षित नाहीत. कोवीड मुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या जनतेला वाढीव वीज बिलामुळे आणखीनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजबिला संदर्भामध्ये सरकारमधील मंत्री देखील काहीच बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक अमोल बालवडकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :PuneपुणेBanerबाणेरChitra Waghचित्रा वाघPoliceपोलिसjagdish mulikजगदीश मुळीकGovernmentसरकार