शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गणेशभक्तांसाठीची टोलमाफी ' हवे' तच : केंद्र शासनाकडून टोलमाफीची सुचना न आल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 11:38 IST

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणात जाणाºया गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या टोलनाक्यांवरही ‘एसटी’कडून टोल

पुणे : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. राज्य शासनाच्या ‘एसटी’ बसलाच टोल भरावा लागत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाकडून टोलमाफीचे सुचना न आल्याचे कारण देत पुणे-सातारा मार्गावर टोलवसुली केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या टोलनाक्यांवरही ‘एसटी’कडून टोल घेतला जात असल्याने टोलमाफीचा केवळ फार्स ठरला आहे. कोकणात गणेशोत्सवाची मोठी धामधुम असते. याकाळात पुणे-मुंबईतून कोकणात जाणाºया गणेशभक्तांची संख्या खुप मोठी असते. यापार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली. मागील वर्षीही अशी टोलमाफी देण्यात आली होती. प्रामुख्याने खेड शिवापुर, तासवडे, किणी, पुणे-मुंबई दु्रतगती मार्ग, वाशी आदी टोलनाक्यांवर टोलमाफी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण या घोषणेला टोलचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. पुण्यातून स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवडमधून कोकणात जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली होती. ३० आॅगस्टपासून जादा बस सोडण्यात येत आहेत. त्यामध्ये महाड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, खेड, गुहागर, मंडणगड, रोहा आदी ठिकाणांचा समावेश आहे. प्रवाशांकडून एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीचे दोन दिवस दररोज सुमारे १५० जादा बस सोडल्या.टोलमाफीची घोषणा झाल्यानंतर ‘एसटी’कडून कोकणात जाणाºया बसला ‘गणेशोत्सव विशेष’ असे स्टीकर्स लावले. तसेच बसला बसविलेली ‘फासटॅग’ ही इलेक्ट्रॉनिक टोल यंत्रणाही बंद केली होती. पण प्रत्यक्ष टोलनाक्यावर गेल्यानंतर बसचालक व टोल नाक्यावरील कर्मचाºयांमध्ये वाद होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर काही चालकांनी बस तशाच पुढे दामटल्या. तर काही चालकांना पदरमोड करून टोल भरावा लागला. तसेच काही चालकांकडून टोलनाक्यावरच बस थांबविण्यात येत होत्या. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून वाद व विलंब टाळण्यासाठी टोल भरण्यास सुरूवात केली. पुणे-सातारा मार्गावरील टोलनाक्यांसह कोकणात जाणाऱ्या बहुतेक टोलनाक्यांवर टोलवसुली करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘एसटी’लाच टोलमधून सुटका मिळत नसल्याने वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. .........कोकणात जाणाºया गणेशभक्तांच्या खासगी वाहनांना टोलमाफीसाठी विशेष स्टीकर्स, पासची व्यवस्था केली आहे. पोलिस ठाण्यांमध्ये हे पास मिळत आहेत. हे पास असूनही खेड शिवापुर टोलनाक्यावर टोलमाफी मिळत नाही. याबाबत तेथील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी केंद्र सरकारकडून याबाबत कोणत्याही सूचना नसल्याचे सांगितले. हा टोलनाका केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. त्यामुळे त्यांच्या सुचना असल्याशिवाय टोलमाफी दिली जात नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.टोलमाफीच्या घोषणेनंतर बसला स्टीकर्स लावण्यात आले होते. पण कोकणात जाणाºया एसटी बसकडून टोल घेतला जात आहे. बहुतेक टोलनाक्यांवर हीच स्थिती आहे. टोलमाफीची सुचना मिळाली नसल्याचे टोलनाक्यांवर चालकांना सांगितले जात आहे. त्यामुळे टोल भरावा लागत आहे.- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाCentral Governmentकेंद्र सरकारGanesh Mahotsavगणेशोत्सव