शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:31 IST

गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देशेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम

पुणे : गावातील तरुणांचा राजकारणाची खोटी आशा दाखवून राजकीय नेतृत्व तरुणांच्या डोक्यात हवा घालत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहिन होत आहे. चंगळवाद जोपासणारे आणि पोसणारे हे राजकारण ग्रामीण तरुणांना कोणत्या थराला घेऊन जात आहे, याचा अंदाज कोणालाच येत नाही. तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मेघा पाटील लिखीत ‘शेतकरी नवरा’ आणि ‘विस्कटलेली चौकट’ या दोन कादंब-यांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार, अमरसिंग देशमुख, वि.दा. पिंगळे आणि रमेश पाटील उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘लाखोंचा पोशिंदाच आज चक्रव्युहात सापडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे त्याच्यापर्यंत शहरी प्रगती आणि घडामोड पोहोचत आहेत. परंतु, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील वाढती तफावत त्यांना गोंधळात टाकत आहे.’‘काळ्या मातीशी इमान राखत निष्ठेने वाटचाल करावी तर नक्की कोणत्या आशेवर, याबाबत शेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम निर्माण केले आहेत. शहरातील चकचकीत जीवन त्यांना आकर्षित करते. परंतु, आकर्षक जीवनातील तडजोडींचा त्यांना अंदाज येत नाही. योग्य वेळी तो़डगा न मिळाल्यास अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल.’ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, ‘प्रत्येक लिखाण हे वाङ्मय या वर्गवारीत मोडू शकत नाही. त्या लिखाणाला वाङ्मयीन मुल्ये प्राप्त होण्यासाठी अनुभवाची धार लागणे आवश्यक असते. अस्वस्थेतून निर्माण होणारे वाङ्मय हे खरे साहित्य. अस्सल वाडमय हे सुसंवाद खुंटवणारे नसून ते सुसंवाद वाढवणारे असते.’सुनिताराजे पवार, मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि.दा. पिंगळे  यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसFarmerशेतकरी