आज ‘नीट’ परीक्षा, १८० ऐवजी २०० प्रश्न असणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST2021-09-12T04:15:18+5:302021-09-12T04:15:18+5:30
कोरोनामुळे यावर्षी सुध्दा नीट परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतली जात आहे. पुण्यासह देशभरात नीट परीक्षा आयोजिली असून, रविवारी दुपारी २ ...

आज ‘नीट’ परीक्षा, १८० ऐवजी २०० प्रश्न असणार
कोरोनामुळे यावर्षी सुध्दा नीट परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतली जात आहे. पुण्यासह देशभरात नीट परीक्षा आयोजिली असून, रविवारी दुपारी २ ते ५ या कालावधीत ऑफलाइन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षाकेंद्रावर परीक्षा होणार आहे. मागील वर्षी नीट परीक्षेचा पेपर खूपच सोपा होता. त्यामुळे ७२० पैकी ७२० गुण मिळवणारे देशात दोन विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थ्यांना ७०० ते ६५० गुण मिळाले होते. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा कट ऑफ वाढला होता. यावर्षी पेपर सोपा येतो की अवघड यावर कटऑफ वाढणार की कमी होणार हे अवलंबून आहे.
सर्वसाधारणपणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयाचे ४५ प्रश्न सोडविण्यासाठी दिले जातात. मात्र, यंदा प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ५० प्रश्न दिले आहेत. त्यातील प्रत्येकी ४५ प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रश्न सोडविण्यासाठी एका मिनिटाचा अवधीसुध्दा मिळू शकणार नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.