आरटीई प्रवेशाबाबत आज संस्थाचालकांची बैठक

By Admin | Updated: April 24, 2015 03:41 IST2015-04-24T03:41:37+5:302015-04-24T03:41:37+5:30

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आॅनलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेशाबाबत इंग्रजी

Today's meeting of institutional people about RTE admission | आरटीई प्रवेशाबाबत आज संस्थाचालकांची बैठक

आरटीई प्रवेशाबाबत आज संस्थाचालकांची बैठक

पुणे : प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आॅनलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेशाबाबत इंग्रजी माध्यामांच्या शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे २४ एप्रिलला सकाळी ११ वाजता राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये संस्थाचालकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गांमध्ये आरटीईचे प्रवेश शाळांकडे का पाठविण्यात आले याचा उलगडा होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर म्हणाले, ‘शिक्षण विभागाने शाळांना दोन एट्री पॉईंटवर प्रवेश देण्याच्या सूचना केलेल्या नाहीत, मागील वर्षाच्या रिक्त जागांवरचे प्रवेश यंदा पाठविण्यात आले आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयास याबाबत बैठक घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.’’

Web Title: Today's meeting of institutional people about RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.