शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात हिंसाचाराला कारण ठरलेल्या कोरेगाव-भीमामध्ये आज ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 10:58 IST

कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगाव-भीमामध्ये नेमक काय घडलं ? कशामुळे इतका हिंसाचार उफाळून आला?

पुणे - कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांची बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन हे ग्रामस्थ आपली भूमिका मांडतील. 1 जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला.  त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जाळपोळ, वाहनांची तोडफोड, रास्ता रोको, रेल रोको, मार्चे, आंदोलने झाली. त्यामुळे दोन समाजांमधील तेढ अधिक वाढून राज्यातील वातावरण गढूळ झाले. 

त्या पार्श्वभूमीवर आता कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी सामंज्यसाची भूमिका घेत वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. गावक-यांनी परस्पराविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगाव-भीमामध्ये नेमक काय घडलं ? कशामुळे इतका हिंसाचार उफाळून आला? त्याचा पोलीस शोध घेत आहेत. 

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अन्य माहिती घेत आहेत. बंदच्या दरम्यान हिंसाचार करणा-यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थ सुद्धा अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे गावक-यांनी आता सामंज्यसाची भूमिका घेतली आहे. 

नगरमध्ये आज दलित संघटनांचा मोर्चाकोरेगाव-भीमा घटनेतील दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात शहरासह जिल्ह्यातून भीमसैनिक उपस्थित राहतील ,अशी माहिती सुनील क्षेत्रे व अजय साळवे यांनी गुरुवारी येथे दिली.नगर-पुणे रोडवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेऊन जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जाणार असल्याचे साळवे म्हणाले.

राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाख द्याकोरेगाव भीमा येथील दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एक जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा- कोरेगाव घटनेचा मराठा क्रांती मोर्चाने जाहीर निषेध नोंदविला आहे. या घटनेला भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावतीचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आमदार बोंडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ५८ मोर्चे काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गीय समाजाला माहीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव