स्त्रीशक्तीचा आजपासून जागर
By Admin | Updated: October 13, 2015 01:30 IST2015-10-13T01:30:26+5:302015-10-13T01:30:26+5:30
नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव म्हणजे ‘नवरात्र’. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ती-आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना

स्त्रीशक्तीचा आजपासून जागर
पुणे : नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव म्हणजे ‘नवरात्र’. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ती-आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना. उद्या (मंगळवार)पासून शहरात नवरात्रोत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ होत असून, भवानी माता, चतु:शृंगी, महालक्ष्मी मंदिर, तांबडी जोगेश्वरी आदी मंदिरे रंगरंगोटी, फुलांची आरास, लायटिंगच्या माळा या माध्यमातून सज्ज झाली आहेत.
नवरात्रातील ९ दिवसांच्या माध्यमातून दुर्गादेवी तेज तत्त्वाच्या आधारे आपल्या ९ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते. हे ९ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी तसेच आदिशक्तीच्या मारकरूपी चैतन्यमय लहरी यांचे युद्ध सुरू असते.
या वेळी ब्रह्मांडातील वातावरण
तप्त झालेले असते व श्री
दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्मशक्तींवर हल्ला करीत असते. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना पुजले
जाते. यासाठी घरोघरी
आणि मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याची परंपरा वर्षानुवर्षे
चालत आलेली आहे. या ९ दिवसांमध्ये उपवास करण्याचीदेखील प्रथा आहे. नवरात्रामध्ये देवीच्या ९ रसांमधील ९ रूपांचे दर्शन भाविकांना घडते. त्यांना अनुसरून देवीला साड्या परिधान केल्या जातात.