आज फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:07+5:302021-05-15T04:10:07+5:30
पुणे : कोव्हॅक्सिनचा १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठीच शनिवार (दि. १५) रोजी रोजी शहरातील १५ केंद्रांवर दुसरा डोस ...

आज फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मिळणार
पुणे : कोव्हॅक्सिनचा १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठीच शनिवार (दि. १५) रोजी रोजी शहरातील १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. तर अन्य कुठल्याही नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला अथवा दुसरा डोस कुठेच उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
महापालिकेला गुरुवारी रात्री कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गेली कित्येक दिवस कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना उद्यापासून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक अशा पंधरा लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस प्राप्त होणार आहे. महापालिकेकडून या सर्व ठिकाणी प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.
दरम्यान महापालिकेला शुक्रवारी रात्रीपर्यंत कोव्हिशिल्ड लसचा पुरवठा राज्य शासनाकडून न झाल्याने तसेच महापालिकेकडीलही सर्व डोस संपल्याने, शनिवार रविवारी तरी शहरात कोव्हिशिल्डचे डोस दिले जाणार नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासह, कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सर्वत्रच बंद राहणार आहे.