आज केवळ ६१ केंद्रांवर कोविशिल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST2021-06-05T04:09:24+5:302021-06-05T04:09:24+5:30

पुणे : महापालिकेच्या केवळ ६१ केंद्रांवर शनिवारी (दि. ५) कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत. ...

Today Kovishield at only 61 centers | आज केवळ ६१ केंद्रांवर कोविशिल्ड

आज केवळ ६१ केंद्रांवर कोविशिल्ड

पुणे : महापालिकेच्या केवळ ६१ केंद्रांवर शनिवारी (दि. ५) कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. आॅनलाइन स्लॉट बुकिंग करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार असून, केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना यात नोंदणी करता येणार आहे. उपलब्ध कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून अपॉईंटमेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तर उर्वरित लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तसेच शिल्लक डोस हे १२ मार्चपूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.

-----

८ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

ज्या नागरिकांनी ८ मेपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़

--------------------

Web Title: Today Kovishield at only 61 centers