शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी आज मार्गदर्शन वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:25 IST

अकरावी प्रवेशाचा आॅनलाईन अर्ज भरणे व त्यासंबंधित माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. १३) शहरात विभागनिहाय ७ ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : अकरावी प्रवेशाचा आॅनलाईन अर्ज भरणे व त्यासंबंधित माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. १३) शहरात विभागनिहाय ७ ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.गरवारे कॉलेज, कलमाडी हायस्कूल (एरंडवणे), पटर्वधन विद्यालय (दांडेकर पूल), आझम कॅम्पस (कॅम्प), साधना विद्यालय (हडपसर), मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर), म्हाळसाकांत महाविद्यालय (आकुर्डी) येथे यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाचा (एसएससी) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबत पालकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.शहरात १३ जून रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या विभागांत याचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालयात ११ ते १ या वेळेत, कलमाडी विद्यालयात २ ते ४ या वेळेत, पटवर्धन विद्यालयात १ ते २ या वेळेत, आझम कॅम्पसमध्ये दुपारी ३ ते ४ या वेळेत, साधना विद्यालयात ११ ते १ या वेळेत, मॉडर्न महाविद्यालयात दुपारी ३ ते ४ या वेळेत, म्हाळसाकांत महाविद्यालयात ११ ते १ या वेळेत हे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले आहेत.अकरावी प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास दि. १४ मे २०१८ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत ७३ हजार ९२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन भरले गेले आहेत. त्यांपैकी १७ हजार ६५३ अर्जांची पडताळणी झालेली नाही. ज्यांनी आतापर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही, त्यांना अर्जाचा भाग १ व भाग २ एकाच वेळीभरता येणार आहे. यासाठी २५ जूनपर्यंत अखेरची मुदत देण्यात आलेली आहे. प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहितीपुस्तिका विकत घ्यायची आहे.या पुस्तिकेत लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याआधारे लॉगइन करून त्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह आरक्षण, कोटा ही माहिती नमूद करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दुसºया भागात त्यांच्या गुणांची माहिती भरावी लागेल.

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे