मुस्लिम समाज मोर्चामुळे आज वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:57 IST2018-09-09T00:57:44+5:302018-09-09T00:57:46+5:30

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध मागण्यासाठी मुस्लिम समाजाकडून रविवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़

Today, due to the Muslim society, the change of transport today | मुस्लिम समाज मोर्चामुळे आज वाहतुकीत बदल

मुस्लिम समाज मोर्चामुळे आज वाहतुकीत बदल

पुणे : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध मागण्यासाठी मुस्लिम समाजाकडून रविवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
गोळीबार मैदान येथून सुरू होणारा मोर्चा शंकरशेठ रोडमार्गे सेव्हन लव्हज चौकातून उजवीकडे वळून नेहरू रोडने सोनावणे हॉस्पिटल, संत कबीर चौक, पावर हाउस चौक, ससून चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, साधू वासवाणी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे़
गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा मोर्चाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे़ पर्यायी मार्ग गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे़ सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक मोर्चाच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे़ सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक मोर्चाच्या काळात पूर्णपणे बंद असणार आहे़ कोंढवा परिसरातून गोळीबारकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने व इतर वाहने बंद करण्यात आली आहे.

Web Title: Today, due to the Muslim society, the change of transport today