आज शहरातील १८८ केंद्रांवर प्रत्येकी १३० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:15 IST2021-08-14T04:15:02+5:302021-08-14T04:15:02+5:30

पुणे : पुणे महापालिकेला गुरूवारी ७४ हजार कोव्हिशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे शुक्रवारी २०० लस पाठोपाठ, आजही (शनिवारी ...

Today, 130 covshield vaccines are available at 188 centers in the city | आज शहरातील १८८ केंद्रांवर प्रत्येकी १३० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

आज शहरातील १८८ केंद्रांवर प्रत्येकी १३० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

पुणे : पुणे महापालिकेला गुरूवारी ७४ हजार कोव्हिशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे शुक्रवारी २०० लस पाठोपाठ, आजही (शनिवारी दि. १४) १८८ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १३० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित केले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ७ दवाखान्यात प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस दिली आहे़

आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़ तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( २२ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़ यानंतरही लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास दिल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ़ सूर्यकांत देवकर यांनी दिली़

लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

-----------------

Web Title: Today, 130 covshield vaccines are available at 188 centers in the city