आज ५७ केंद्रांवर प्रत्येकी १२० कोविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST2021-09-23T04:12:07+5:302021-09-23T04:12:07+5:30

पुणे : पुणे महापालिकेच्या ५७ लसीकरण केंद्रांवर आज (गुरुवार, दि. २३) प्रत्येकी १२० कोविशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले ...

Today, 120 Covishield vaccines each at 57 centers | आज ५७ केंद्रांवर प्रत्येकी १२० कोविशिल्ड लस

आज ५७ केंद्रांवर प्रत्येकी १२० कोविशिल्ड लस

पुणे : पुणे महापालिकेच्या ५७ लसीकरण केंद्रांवर आज (गुरुवार, दि. २३) प्रत्येकी १२० कोविशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांत प्रत्येकी ४

३०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (३० जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today, 120 Covishield vaccines each at 57 centers