बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी
By Admin | Updated: October 24, 2014 05:21 IST2014-10-24T05:21:40+5:302014-10-24T05:21:40+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत

बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी
पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत.
नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने दागिने, प्लॅट, घरे खरेदी अशा वस्तू खरेदी करीत आहेत. पाडव्याला नवीन वस्तु खरेदी करण्याला पसंती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारपेठत मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून येत आहे. टी.व्ही., फ्रीज, मोबाईल्स, ओव्हन, इस्त्री, पंखे, कॅमेरा आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. तरूणाईची पसंती नवीन टेंड्रचे मोबाईलला आहे. वविध वस्तुंवर डिस्काऊंट देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढलेला दिसून येतो. यामुळेही बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. विविध मॉल्स, इलेक्ट्रॉनिेक शोरूम याचे प्रत्यंतर येते. सर्वात मोठा उत्साह वाहन खरेदीला दिसून आला. पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी बुकींग मोठया प्रमाणावर झाली आहे. वाहन खरेदीवर डिस्काऊंट देखील देण्यात येत आहे. महिन्यापासून चारचाकी खरेदीसाठी ओढ सुरू आहे. चारचाकी खरेदीसाठी ५ लाखांपासून पुढे गुंतवणूक ग्राहक करत आहेत. दुचाकी विक्रेते नारायण दौंडकर यांनी सांगितले की, दुचाकी गाडयांची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा दुचाकींची
विक्री अधिक झाली आहे. चांगल्या सीसी व मायलेजच्या गाड्यानांही पसंती मिळाली आहे.
दिवाळी ही नवीन कपडयाशिवाय होऊ शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठया व्यक्तिपर्यंत कपडे खरेदीचा उत्साह जाणवत आहे. लहान
मुलांच्या कपडयांमध्ये विविध प्रकारचे नवीन ट्रेंड बाजरातआहेत. मोदी ड्रेसला पसंती मिळत आहे. कांजीवरम,
बनारसी, पैठणी, कॅटलॉग साडया, विविध प्रकारच्या फॅ न्सी सिल्क
साडयाना बाजारात मोठया प्रमाणावर मागणी आहे. विक्रेते निलेश
कटारिया यांनी माहिती दिली की, दिवाळीत कपडे खरेदीचा मोठया प्रमाणात उत्साह आहे. (प्रतिनिधी)