शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भिती दाखविण्यासाठी तिने घेतले पेट्रोल ओतून, पतीने लावली काडी

By विवेक भुसे | Updated: September 21, 2023 12:00 IST

पती दररोज पत्नीला दारू पिउन मारहाण करत असे

पुणे : दारु पिऊन घरी येऊन मारहाण करणाºया पतीला भिती दाखविण्यासाठी तिने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेऊन मी मरते आता, असे म्हणाली, त्यावर पतीने काडी ओढून तिला पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय मारुती कुंजीर आणि आशा मारुती कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावातील फिर्यादीच्या घरी १२ सप्टेबर रोजी दुपारी २ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा वारंवार दारु पिऊन येऊन मारहाण करतो. १२ सप्टेबरला तो असाच दारु पिऊन आला व घरातील सामानाची तोडफोड करीत होता. यावेळी तिची सासू व सासरे शेतात गेले होते. त्यावेळी अक्षय याने तु घरातून निघून जा, तु घरात रहायचे नाही, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी मी मरुन जाते, असे म्हणाल्या. शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल त्याला भिती दाखविण्यासाठी अंगावर ओतले. त्यावेळी त्याने काडे पेटी आणून अंगावर टाकली. त्यामुळे त्या पेटल्या. त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तू जर तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भिती सासुने दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी