दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची

By Admin | Updated: October 3, 2014 23:32 IST2014-10-03T23:32:28+5:302014-10-03T23:32:28+5:30

पुणो जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. माघार झाल्यानंतर निवडणुकीतील उमेदवार निश्चित झाले असून, सर्व उमेदवार प्रचाराच्या पहिल्या टप्प्यासाठी जुंपले आहेत.

Tiring! The candidates and the police | दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची

दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची

>घोडेगाव : पुणो जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. माघार झाल्यानंतर निवडणुकीतील उमेदवार निश्चित झाले असून, सर्व उमेदवार प्रचाराच्या पहिल्या टप्प्यासाठी जुंपले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक उमेदवार गावोगावी भेटी देण्यावर भर देत असतो. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग असून, अशा आदिवासी पाडय़ांमध्ये जाऊन प्रचार करणो अतिशय दमछाक करणारे व जिकिरीचे काम असते. सध्या येथे जाऊन  प्रचार सुरू आहे.  
जिल्ह्यात मुळशी, मावळ, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये डोंगराळ, दुर्गम परिसर आहे. या डोंगरद:यांमध्ये आदिवासी पाडे वसलेले आहेत. येथील मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना या ठिकाणांर्पयत पोहोचावे लागते. अनेक गावांर्पयत पोहोचण्यासाठी कच्चे रस्ते झाले आहेत. मात्र, काही गावांर्पयत पायी जावे लागते. तसेच, डोंगरद:यांमध्ये अनेक धरणो झाली आहेत.
 या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत वाडय़ा-वस्त्या वसलेल्या आहेत. यांच्यार्पयत पोहोचण्यासाठी होडीने जावे लागते. अशा सर्व मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सध्या सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात मोठय़ा, सभा-मेळावे होत नाहीत तर गावोगावी जाऊन भेटी, मतदारांशी संपर्क केला जातो. सकाळी व संध्याकाळी गावोगावी लोक भेटतात 
म्हणून उमेदवार भल्या पहाटय़ा निघून वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संपर्क साधतात. 
मिळेल त्या जागी बसून मतदारांशी संवाद साधला जातो. लोकांच्या समस्या जाणून घेणो व आपल्या पक्षाकडून झालेल्या कामांची माहिती मतदारांना देणो, असा प्रचार सुरू असतो.  (वार्ताहर)
 
4अनेक वेळा मतदार डोंगर-द:यांमध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असतात अथवा शेतामध्ये काम करीत असतात, तिथे जाऊन उमेदवार त्यांच्याशी संवाद साधतात. अशा वेळी मतदारांनाही आपल्याकडे ब:याच वर्षानंतर कोणीतरी आले म्हणून आनंद होतो. 
4दुपारच्या वेळी उमेदवार एखाद्या कार्यकत्र्याच्या घरी अथवा झाडाखाली बसून वनभोजन व आराम करतात व सायंकाळी पुन्हा प्रचार सुरू होतो. उमेदवाराच्या मागे फिरणा:या अचारसंहिता भरारी पथकातील शासकीय कर्मचारी व पोलिसांचे हाल होतात. 
4खाण्यास काही नसल्याने बिस्किटे व चिक्की खाऊन दिवस काढावा लागतो. या डोंगरद:यांमध्ये फिरताना उमेदवारांची दमछाक होते, तर कार्यकर्ते एक दिवसाचे पिकनिक समजून मजा करतात. 
 
निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता आणि पोलीस आयुक्तांनी लागू केलेले कलम 144 नुसार अटी व शर्तींच्या अधिन राहूनच राजकीय पक्षांना पदयात्र आणि रॅलीसाठी परवानगी दिली जाते. नियमभंग झाल्यास अथवा आचारसंहिता भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.  
- दीपाली धाटे-घाडगे, 
सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा
 
पदयात्र आणि रॅलींच्या परवानग्यांच्या कामाचा पोलिसांवर ताण
4पुणो : निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतरही राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित करायला वेळ लावला. अगदी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी जवळपास सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले. त्यामुळे उमेदवारांच्या हातामध्ये मुळातच प्रचारासाठी कमी वेळ राहिलेला आहे. वैयक्तिक भेटीगाठींपेक्षाही पदयात्र आणि रॅली काढून उमेदवार प्रचाराला लागले आहेत. उमेदवारांच्या पदयात्र आणि रॅलींना परवानग्या देता देता मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. सध्या 15   एक खिडकी केंद्रांमध्ये दिवसाला साधारणपणो 7क् ते 11क् अर्ज दाखल होत आहेत. 
4यंदा प्रत्येक विधानसभानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. अशा 15 केंद्रांवर एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांना लागणा-या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा यंत्रणांनी प्रयत्न केलेला आहे. या एक खिडकीच्या प्रत्येक केंद्रावर नोडल ऑफीसर म्हणून सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा एक अधिकारी, पोलीस निरीक्षक अथवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्या त्या विभागातील पोलीस ठाण्यांचा एक आणि वाहतूक शाखेचा एक  असे दोन अधिकारी सहायक आयुक्तांच्या मदतीला देण्यात आले आहेत. यासोबतच मध्यवर्ती ठिकाणीही एक सहायक आयुक्त आणि दोन पोलीस निरीक्षक नेमण्यात आले आहेत.   
4एक खिडकीच्या प्रत्येक केंद्रावर दिवसाला साधारणपणो सात ते दहा अर्ज दाखल होत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येणा-या अकरा मतदार संघांमध्ये असलेल्या अकरा एक खिडकी योजनेमध्ये दिवसाला साधारणपणो 7क् ते 11क् अर्ज दाखल होत असल्याची माहिती मध्यवर्ती केंद्राच्या सहायक आयुक्त दिपाली धाटे - घाडगे यांनी दिली. 
4एक खिडकीमध्ये आलेल्या या सर्व अर्जाची छाननी करुन ते अर्ज तातडीने संबंधित पोलीस ठाण्यांना रवाना करण्यात येतात. पोलीस ठाण्यांमध्येही पदयात्र आणि रॅलींसंबधी काम पाहण्याकरीता दोन दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हे कर्मचारी अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या पदयात्र व रॅलींची माहिती घेतात.   
4दोन पक्षांच्या पदयात्र एकमेकांसमोर येऊ नयेत अथवा कोणत्याची रस्त्यावरुन एकमेकांना  ‘क्रॉस’ होऊ नयेत याची दक्षता घेऊन पाहणी करतात. या परवानग्यांची एनओसी दिली जाते. पोलीस ठाण्यांवरुन अहवाल आला की तातडीने मध्यवर्ती कार्यालयातून संबंधितांना परवानगी पाठवली जाते. परंतु प्रत्येक मतदार संघांमध्ये पाच पेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे पोलिसांवर ताण आहे.

Web Title: Tiring! The candidates and the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.