शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

टिळकांना अपेक्षित उत्सव व्हावा : रवींद्र वंजारवाडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:16 IST

तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धा

पौड : गणेशोत्सव, शिवजयंती यासारख्या सार्वजनिक उपक्रमांच्या निमित्ताने देशातील युवा शक्तीने एकत्र येऊन विधायक कामे करावीत, यासाठी टिळकांसारख्या महापुरुषांनी हे या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिले. हे उत्सव आता देशभरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हा उत्सव अधिक मंगलमय व्हावा. पर्यावरणपूरक व्हावा. याकरिता मुळशी तालुक्यात आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या माध्यमाने स्पर्धा आयोजित करून गणेश मंडळांना दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी उपजिल्हा अधिकारी रवींद्र वंजारवाडकर यांनी केले.

ते घोटावडे फाटा येथे आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना पौड पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी यंदा मुळशी तालुक्यात गणेशोत्सवादरम्यान कोठेही कायद्याचा भंग न होता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. या स्पर्धांमुळे मंडळांना एक वेगळी दिशा मिळाली आहे. परिणामी तालुक्यात उत्सव कालावधीत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचा उल्लेख निंबाळकर यांनी केला. यावेळी मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे, शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, कमिन्स इंडिया फाउंडेशनचे प्रशांत चितळे, अनिल व्यास, दिलीप शिंदे, सागर काटकर, सचिन साठे, बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब पवळे, बबनराव दगडे, संतोष मोहोळ, स्वाती ढमाले, राम गायकवाड, सचिन खैरे उपस्थित होते.आबासाहेब शेळके मित्र मंडळमुळशी तालुक्यात आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. पोलीस स्टेशनला नोंदणीकृत असलेल्या ११० गणेश मंडळाना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले होते.यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, रवींद्र वंजारवाडकर, सत्यवान उभे, प्रकाश भेगडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भेगडे, पोपट ववले, विनोद मारणे, शाकीर शेख, सोमनाथ शिंदे यांनी केले होते. प्रास्ताविक आबा शेळके यांनी तर सूत्रसंचलन ज्ञानेश्वर डफळ यांनी केले.आबासाहेब शेळके आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत आलेले क्रमांक पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक- तिरंगा मित्र मंडळ, कोळवण, द्वितीय क्रमांक- बालवीर युवक मंडळ पिरंगुट कँप, तृतीय क्रमांक-धर्मवीर संभाजी मराठा मंडळ रिहे, उत्तेजनार्थ- १) सुवर्ण मित्र मंडळ दारवली, २) श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ गावडेवाडी, ३) जय बजरंग तरुण मंडळ मुकाईवाडी, ४) शिवराज कला-क्रीडा मंडळ कुळे,५) शिवशक्ती तरुण मित्र मंडळ भुकूम, विशेष प्रावीण्य -१) भैरवनाथ तरुण मंडळ दारवली, २) श्रीमंत कासारपाटील ट्रस्ट कासार आंबोली, ३) हनुमान तरुण मंडळ पिरंगुट (पवळेआळी), गुणवंत कार्यकर्ते : १) चंद्रशेखर रानवडे (नांदे), २) अक्षय इप्ते (पौड), ३) नंदा सस्ते (पिरंगुट),४) गौरी गोळे (पिरंगुट), ५) अर्चना सुर्वे (भूगाव). 

टॅग्स :Puneपुणे