टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

By विवेक भुसे | Published: September 10, 2023 10:32 PM2023-09-10T22:32:49+5:302023-09-10T22:33:39+5:30

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ‘फेलसेफ'ला

Tilak Ayurveda College wins Purushottam Karandak! | टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

googlenewsNext

श्रीकिसन काळे

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८ व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत टिळक आयुर्वेद महाविद्यालयाने सादर केलेल्या पिक्सल्स् एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व ५००१ रुपयांचे पारितोषिक मॉडर्न महाविद्यालयाने (गणेशखिंड) सादर केलेल्या ‘फेलसेफ' एकांकिकेने पटकाविले.

स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक स.प. महाविद्यालयाला (एकांकिका - कृष्णपक्ष) तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २००१ रुपयांचे पारितोषिक मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाला (एकांकिका रवायत - ए- विरासत) जाहीर करण्यात आले.

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री जाहीर करण्यात आला.

सविस्तर निकाल :

सांघिक प्रथम : पिक्सल्स् (टिळक आयुर्वेद महाविद्यालय)
सांघिक द्वितीय : कृष्णपक्ष (स. प. महाविद्यालय)

सांघिक तृतीय : रवायत - ए - विरासत (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : फेलसेफ (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : समृद्धी भोसले आणि यशदा टेंबे (परत फिरा रे, झील अभियांत्रिकी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : शिरीष कुलकर्णी (फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : आभा पटवर्धन आणि आर्या शिरसाठ (त्रिज्या, फर्ग्युसन कॉलेज, स्वायत्त)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अक्षय जाजू व सौरभ विजय (पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय)

उत्तेजनार्थ दिग्दर्शन : श्रीरंग वैद्य (फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)
उत्तेजनार्थ दिग्दर्शिका : श्रीनिधी झाड व शिरीन बर्वे (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय)

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : कोणीही नाही
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : इमरान तांबोळी (पाऊसपाड्या, पाऊसपाड्या, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय)

अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : वैष्णवी चामले (आई (लता), पिक्सल्स, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पणे)
वाचिक अभिनय नैपुण्य : कोणीही नाही

उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : मुकुल ढेकळे (रहीमचाचा, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), गौरव पायुगडे (इख्तार, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), साक्षी परदेशी (अक्का, (इंदू), मायबाप..?, आयएमसीसी), ऋषभ जैन (शेखर, मायबाप..!?, आयएमसीसी), रिद्धेश पाटील (रहीमचाचा, पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय), अद्वय पुरकर (वासू, कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), श्रीरंग वैद्य (आदेश इनामदार, फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड), विजय पाटील (तात्या (संपत), पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय), अभिषेक लवाटे (सोन्या, मायबाप..!?, आयएमसीसी), वैष्णवी जाधव (सुमन, पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय).

सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : भगीरथ करंडक : व्हीआयआयटी

दीपक रेगे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १४ सप्टेबर रोजी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम फेरीत पुरुषोत्तम करंडक पटकाविलेल्या पिक्सल्स या एकांकिकेचे सायंकाळी ५ वाजता सादरीकरण होणार असून त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.

Web Title: Tilak Ayurveda College wins Purushottam Karandak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.