कडेकोट बंदोबस्त
By Admin | Updated: January 26, 2015 01:32 IST2015-01-26T01:32:55+5:302015-01-26T01:32:55+5:30
ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी, संशयित दुचाकी चालकांकडे चौकशी असे चित्र रविवारी शहरात ठिकठिकाणी दिसत होते.

कडेकोट बंदोबस्त
पिंपरी : ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी, संशयित दुचाकी चालकांकडे चौकशी असे चित्र रविवारी शहरात ठिकठिकाणी दिसत होते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षितता असली तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने आणखीणच काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहते. शहरात गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाच्या चौकांमध्ये रविवारी नाकाबंदी होती. भक्ती-शक्ती चौक हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने येथे रविवारी रात्री वाहनांची कसून तपासणी केली जात होती. यासह टिळक चौक, आकुर्डी रेल्वे स्थानकासह महत्वाच्या सहा ठिकाणी दर दोन तासांनी नाकाबंदी केली जात होती. निगडी पोलिसांनी देहूरोड व चिंचवड पोलिसांशी समन्वय
साधून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. कुदळवाडी, ओटास्किम भागात विशेष लक्ष दिले जात आहे. वाहनतळातील वाहनांचीही तपासणी केली जात होती. (प्रतिनिधी)