कोथरूड येथे वाघाची कातडी सापडली
By Admin | Updated: June 10, 2017 02:24 IST2017-06-10T02:24:54+5:302017-06-10T02:24:54+5:30
वाघाची सहा लाख रुपये किमतीचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला कोथरुड पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी अटक केली.

कोथरूड येथे वाघाची कातडी सापडली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाघाची सहा लाख रुपये किमतीचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला कोथरुड पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी अटक केली.
संदीप बबन शेळके (वय ३८, रा. सुतारदरा, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोथरूड येथील पेठकर सोसायटीजवळ संदीप वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी सापळा रचला. एका पिशवीमध्ये वाघाचे कातडे घेऊन चालला होता.
पोलिसांना त्याच्या हालचाली संशयित वाटल्याने त्याच्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सहा लाख किमतीचे
वाघाचे कातडे मिळून आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड यांच्यासह पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस नाईक मिलिंद कदम, विजय काकडे, पोलीस शिपाई सुनील हागवणे यांनी केली.
संदीप याने हे कातडे कोठून व कोणास विकण्यास आणले होते, यात त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का, याविषयी तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली.