बंधा:यांना गळती
By Admin | Updated: November 27, 2014 23:04 IST2014-11-27T23:04:34+5:302014-11-27T23:04:34+5:30
एकीकडे शेतक:यांची पाण्याची मागणी वाढत असताना बंधा:यांतून मोठी गळती सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बंधा:यांना गळती
एकीकडे शेतक:यांची पाण्याची मागणी वाढत असताना बंधा:यांतून मोठी गळती सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब येथील भोरकरवाडी बंधा:यातून तसेच पाटेठाण (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधा:यांना मोठी गळती सुरू आहे.
कळंब / पाटेटाण : इंदापूर तालुक्यातील भोरकरवाडी बंधा:यातून गंजलेले ढापे पाण्याच्या वेगामुळे तुटल्याने बंधारातून मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे येणा:या उन्हाळ्यात दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
कळंब येथील खंडकरी शेतक:यांना निरा नदीकडील शेती महामंडळाकडून जमिनी मिळाल्याने पाणी परवानासाठी अनेक शेतक:्यांनी मागणी केलेली आहे. सध्या बंधारात 65 एमसीएफटी पाणीसाठा असण्याच्या शक्यतेने पुढील आठ महिने 8क्क् एकर क्षेत्र भिजण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे बंधारात पूर्णत: नवीन ढापे बसवून पाणी गळती थांबवावी, असे यावेळी शेतक:यांनी सांगितले.
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ातील भीमा नदीकाठच्या परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या पाटेठाण येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधा:यांना ढापे टाकून पाणी आडवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु पाटेठाण येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यावर टाकण्यात आलेल्या ढाप्यांमधून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतक:यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्वरीत ढापे दुरुस्त करुन गळती बंद करण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर भीमा व मुळा मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यात ढापे ठाकून पाणी साठवायला सुरुवात करण्यात येते. याप्रमाणो सद्यस्थितीत संबंधित विभागाकडून या दोन्ही नदीवरील बंधा:यामध्ये ढापे टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु अनेक ठिकाणी ढापे व्यवस्थित न बसवल्यामुळे त्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागली आहे. वास्तविक सद्यस्थितीत पाणी साठा केल्यानंतर तो मे अखेर्पयत पुरतो परंतु अशा स्वरुपात पाणी गळती झाल्यास झपाटय़ाने पाणी कमी होवून ते पुरेल की नाही अशी भीती शेतकरी वर्ग करु लागला आहे.
4कळंबच्या भोरकरवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. त्यामध्ये 58 गाळे आहे. त्यात 446 ढापे बसवले जातात. अनेक वर्षापासून नवीन ढाप्यांची मागणी करूनही अपुरे ढापे मिळत आहे. पाण्याची गळती रोखली जावू शकत नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अंथुण्रे शाखा अभियंता बी. डी. ढोले, सहाय्यक ए. एन. जामदार यांनी सांगितली.
4पाटेठाण (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा:यावर परिसरातील हजारो एकर क्षेत्र येथील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गळती थांबवण्यात यावी, अशी मागणी शेतक:यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.