तिकीट दरवाढीने घटले पीएमपीचे प्रवासी.!
By Admin | Updated: November 13, 2014 00:18 IST2014-11-13T00:18:15+5:302014-11-13T00:18:15+5:30
डिङोल व सीएनजी गॅसची दरात घट होत आहे. त्या वेळी कोणालाही विश्वासात न घेता व जनसुनवाईशिवाय तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे.

तिकीट दरवाढीने घटले पीएमपीचे प्रवासी.!
पुणो : डिङोल व सीएनजी गॅसची दरात घट होत आहे. त्या वेळी कोणालाही विश्वासात न घेता व जनसुनवाईशिवाय तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे. गेल्या काही वर्षातील तिकीट दरवाढीमुळे प्रवासी संख्येत घट होऊन तोटय़ात वाढ झाली आहे, असा दावा विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केला आहे.
शहरातील 13 स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी पीएमपी तिकीट दरवाढीला विरोध करण्याचे निवेदन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्ष यांना नुकतेच दिले. त्यामध्ये पीएमपीने 2क्क्6, 2क्क्8, 2क्1क्, 1क्12 व 2क्13 या काळात तिकीट दरवाढ केली होती. त्यामुळे प्रवासीसंख्येत घट झाली. मात्र, उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नाही. उलट सार्वजनिक बस सेवा सक्षम होण्याऐवजी खासगी बस व दुचाकींचे प्रमाण वाढत गेले. त्याविषयीची आकडेवारी आरटीओला सादर केली आहे.
गेल्या साडेतीन वर्षात पीएमपीवर ग्राहक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेला नाही. शिवाय तिकीट दरवाढीचा निर्णय घेताना प्रवासी, ग्राहक, स्वयंसेवी संस्था व इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही.
कमी अंतराला भाडेवाढीमुळे प्रवासीसंख्या घटणार आहे. त्यामुळे पीएमपीने तातडीने भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी पीएमपी
प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांच्यासह 13 संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
(प्रतिनिधी)
पीएमपी दरवाढीनंतर
प्रवासीसंख्येतील घट..
कालावधी दैनिक प्रवासी उत्पन्न
(लाख) (कोटी)
डिसेंबर 2क्12 11.क्61.14
फेब्रुवारी 2क्131क्.891.16
मार्च 2क्13 1क्.111.13