गुरुवारी ४५० कोरोनाबाधित, ५१५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST2021-06-04T04:08:41+5:302021-06-04T04:08:41+5:30

पुणे : शहरात गुरुवारी ४५० कोरोनाबाधित आढळून आले असून, ५१५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ...

Thursday 450 coronated, 515 coronated | गुरुवारी ४५० कोरोनाबाधित, ५१५ कोरोनामुक्त

गुरुवारी ४५० कोरोनाबाधित, ५१५ कोरोनामुक्त

पुणे : शहरात गुरुवारी ४५० कोरोनाबाधित आढळून आले असून, ५१५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार १६६ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५़ ५१ टक्के इतकी आहे़

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ५ हजार २१३ इतकी आहे़ दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ आजचा शहरातील मृत्यूदर हा १़ ७६ टक्के इतका आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार ३९१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ७४२ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २५ लाख १८ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७१ हजार २२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ५७ हजार ६७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार ३४० जणांचा मृत्यू झाला आहे़

-----------

Web Title: Thursday 450 coronated, 515 coronated