गुरुवारी ३०४ कोरोनाबाधित : १९६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST2021-07-30T04:10:11+5:302021-07-30T04:10:11+5:30

पुणे : शहरात गुरुवारी ३०४ कोरोनाबाधित आढळून आले असून, १९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ...

Thursday 304 corona free: 196 corona free | गुरुवारी ३०४ कोरोनाबाधित : १९६ कोरोनामुक्त

गुरुवारी ३०४ कोरोनाबाधित : १९६ कोरोनामुक्त

पुणे : शहरात गुरुवारी ३०४ कोरोनाबाधित आढळून आले असून, १९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७७५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.९० टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ५८९ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२६ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख ६५ हजार ८६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ६६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोनास्थिती

गुरुवारी बाधित - ३०४

आज घरी सोडले - १९६

एकूण बाधित रुग्ण - ४,८६,६६९

सक्रिय रुग्ण - २,५८९

आजचे मृत्यू - ९

एकूण मृत्यू - ८,७५६

Web Title: Thursday 304 corona free: 196 corona free