राष्ट्रवादी सत्तेसाठी तडफडतोेय : गिरीश बापट
By Admin | Updated: February 17, 2017 04:33 IST2017-02-17T04:33:02+5:302017-02-17T04:33:02+5:30
राष्ट्रवादी अन् काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याने त्यांना सत्तेतून बाहेर काढले असून, पाण्यातून मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो

राष्ट्रवादी सत्तेसाठी तडफडतोेय : गिरीश बापट
कोरेगाव भीमा : राष्ट्रवादी अन् काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याने त्यांना सत्तेतून बाहेर काढले असून, पाण्यातून मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशीच ती तडफडायला लागली असल्याची टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
शिरूर तालुक्यातील केंदूर येथे भाजपाच्या प्रचारसभेत बापट बोलत होते. ते म्हणाले, की राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत वैयक्तिक योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांना सोडणार नाही. राष्ट्रवादी ही अखिल भारतीय राष्ट्रवादी नसून पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष असल्याची टीकाही बापट यांनी केली.
आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, अजित पवारांनी माझ्यावर टीका करीत १ हजार कोटी रुपये कोठून आणले असे विचारतात. त्यांनी आमदारांची पुरवणी बजेटची पुस्तिका पाहावी. मग समजेल आम्ही निधी कोठून आणला. (वार्ताहर)