चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 25, 2017 01:44 IST2017-01-25T01:44:21+5:302017-01-25T01:44:21+5:30
शहर व ग्रामीण भागातील रात्रीच्या वेळी बंद घरात घुसून कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे घराला कुलूप लावून

चोरट्यांचा धुमाकूळ
भोर : शहर व ग्रामीण भागातील रात्रीच्या वेळी बंद घरात घुसून कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे घराला कुलूप लावून बाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत.
भोरमधील विद्याधाम सोसायटी येथील दत्तात्रय कृष्णा खाटपे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, दरवाजा तुटला नाही. त्यामुळे चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून कपाटातील ६ हजारांची रोकड आणि सोडतीन हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरुन नेले. दरम्यान, बंगल्याशेजारी राहणाऱ्या रवींद्र राऊत यांना आवाज आल्याने ते जागे झाले. मात्र चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. शेजाऱ्यांनी कडी काढल्यावर ते बाहेर आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होेते.
वीसगाव खोऱ्यातील पळसोशी गावात एकाच वेळी १५ ते २० चोरट्यांनी एका घरात घुसून चोरी केली. या वेळी घरात तुकाराम सीताराम म्हस्के यांची सून व लहान बाळ होते. मात्र भीतीपोटी ती गप्प राहिली. चोरट्यांंनी घरातील रोख रक्कम व सोनेनाणे असा एकूण सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या शिवाय उमाबाई गुलाबराव म्हस्के, राजाराम आबूराव म्हस्के, नितीन सर्जेराव म्हस्के यांचे बंद घरांचे दरवाजे कटावणीने उचकटुन चोरी केली.