पारगाव येथे कुस्त्यांचा थरार
By Admin | Updated: February 13, 2017 01:22 IST2017-02-13T01:22:46+5:302017-02-13T01:22:46+5:30
पारगाव (ता. दौंड) येथे तुकाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या आखाड्यात कुस्त्यांचा थरार हजारो प्रेक्षकांनी अनुभवला. चितपट कुस्त्यांनी

पारगाव येथे कुस्त्यांचा थरार
केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे तुकाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या आखाड्यात कुस्त्यांचा थरार हजारो प्रेक्षकांनी अनुभवला.
चितपट कुस्त्यांनी हजारो शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तत्पुर्वी दुपारी तीनला सनई ताशाच्या निनादात आखाडा भीमा नदीतीरावरील मैदानावर विसावला. सुरुवातीस ३० किलो वजनगटापासून कुस्त्यांना सुरुवात झाली. ३०० रुपये इनामापासुन ‘ऐका ओ’ या पंचांच्या आरोळीने मैदान परिसर दुमदुमला.
अंतिम लढत बंटी रंधवे (काष्टी) विरुद्ध आकाश ताकवणे (पारगाव) व प्रदीप बोत्रे (पारगाव) विरुद्ध संपत जाधव (इंदापूर) यांच्यात
रंगतदार झाली. ग्रामस्थांनी दोन्ही कुस्त्यांना प्रत्येकी २१ हजार
रुपये इनाम दिला. या आखाड्यात एकूण १५० चितपट कुस्त्या
झाल्या.
विजयी मल्लांना दीड लाख रुपये इनाम वाटण्यात आला. आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी परस्पर विरोधात असलेले मातब्बर उमेदवार माऊली ताकवणे व सयाजी ताकवणे यांच्या हस्ते एक मानाची कुस्ती लावून पंच कमिटीने शौकीनांना सुखद धक्का दिला.
पंच म्हणून विक्रम ताकवले, प्रमोद ताकवणे, रवी बोत्रे, राहुल ताकवले यांनी काम पाहिले. समालोचन रमेश बोत्रे व बाळासाहेब ताकवणे यांनी केले.
यावेळी सरपंच सोपान जाधव, उपसरपंच संभाजी ताकवणे, नामदेव ताकवणे, सुभाष बोत्रे, पोपट ताकवणे, सयाजी ताकवणे, माऊली
ताकवणे, तुकाराम ताकवणे, सर्जेराव जेधे, सोमनाथ ताकवणे, महेश
शेळके, सुरेश ताकवणे, नाना जेधे, संतोष ताकवणे, मल्हारी बोत्रे, वैभव बोत्रे, नामदेव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)