कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी
By Admin | Updated: June 27, 2014 22:57 IST2014-06-27T22:57:38+5:302014-06-27T22:57:38+5:30
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी
>पुणो : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रमेश रामचंद्र हवेले (वय 52, रा. एरंडवणो हौसिंग सोसायटी, पटवर्धन बाग) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवेले पती-पत्नींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत गोविंद सातपुते (5क्, रा. औंध ) यांनी तक्रार दाखल केली आहे. दोघा आरोपींनी त्यांच्या नावावर धनदा पोर्टफोलियो मॅनेजमेंट, धनदा होल्डिंग, धनदा कापोर्रेशन, धनदा एज्युकेशन, धनदा क्लीन एनर्जी, धनदा इंजिनिअरिंग, या कंपन्या सुरु केल्या. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 13 ते 2क् टक्के परतावा मिळेल असे अमिष दाखविले. मात्र प्रत्यक्षात पैसे न देता फसवणूक केली.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी एक कोटी 27 लाख क्8 हजार 171 रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील माधव पौळ यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)