शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर संततधार

By admin | Updated: June 22, 2015 04:32 IST

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांत रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे सुटीचा दिवस शहरवासीयांना घरातच घालवावा लागला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांत रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे सुटीचा दिवस शहरवासीयांना घरातच घालवावा लागला. संततधार सुरू असल्याने पिंपरी आणि चिंचवड परिसरातील विजेचा लपंडाव सुरू होता. ग्रामीण भागातही पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पेरणीसाठी आणखी पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मॉन्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले; मात्र अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. दररोज आकाशात काळे ढग दाटून येतात. मात्र, जोरदार पाऊस होत नाही. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसास सुरूवात झाली. रविवारी सकाळ काही काळ उघडीप मिळाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच उकाडाही जाणवत होता. सकाळी साडेनऊनंतर संततधार सुरू झाली. कधी जोरदार, तर कधी हलक्या सरी दिवसभर पडत होत्या. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या. अचानकपणे आल्याने पावसाने कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची गैरसोय झाली. विजेचा लपंडावपाऊस सुरू असल्याने चिंचवड आणि पिंपरी परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. पिंपरीतील खराळवाडी, मोरवाडी, कॅम्प परिसरातील वीज दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळात वीज अधूनमधून गायब होत होती. चिंचवड गावठाण, बिजलीनगर, पवनानगर, उद्योगनगर, भोईरनगर परिसरातील वीज दुपारी बाराला गायब झाली. ती सायंकाळी साडेपाचपर्यंत बंद होती. असाच प्रकार वाल्हेकरवाडी परिसरातही सुरू होता. पिंपरी बाजारपेठेत गर्दी कमीसुटीच्या दिवशी पिंपरीतील बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नसते. शगुन, साई चौक, जिजामाता रुग्णालय चौकात वाहनांची गर्दी होत असतो. मात्र, पाऊस सुरू असल्याचा परिणाम गर्दीवर झाल्याचे दिसून आले. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. सुटी असतानाही नागरिकांना घराबाहेर न पडणेच पसंद केले. सुटीच्या दिवशी सायंकाळी शहरातील उद्याने गर्दीने बहरलेली असतात. मात्र, निगडीतील भक्ती-शक्ती, थेरगावातील डांगे चौक, पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यानात गर्दी नव्हती. तसेच या उद्यानांबाहेर असणाऱ्या मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळणी आणि नाष्ट्यांच्या हातगाड्याही नव्हत्या. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या हातगाडीवाल्याचे नुकसान झाले.सखल भागात पाणीभोसरी परिसरातील गावठाण, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, एमआयडीसी, चक्रपाणी वसाहत, दिघी रोड या परिसरात दिवसभर संततधार सुरू होती. सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुख्य चौकातील सायंकाळी असणाऱ्या गर्दीवरही पावसाचा परिणाम दिसून आला. मंडईत चिखल पिंपरीतील भाजी मंडईबाहेर चिखल झाला होता. विके्रतेही प्लॅस्टिक कागद डोक्यावर घेऊन भाजी विकत होते. चिखलामुळे भाजी खरेदीला येणाऱ्यांना त्रास होत होता. मोशी भाजी मंडईतही पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मोशी, चऱ्होलीच्या ग्रामीण भागात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, सांगवी, दापोडी, संत तुकारामनगर, चिंचवड स्टेशन, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, चिखली, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, आकुर्डी निगडी परिसरातही पाऊस झाला.