शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 15:30 IST

धरणाच्या माेऱ्यांजवळ अडकलेल्या कुत्र्याला वाचवाचला गेलेले तरुण स्वतःच पाण्यात अडकून पडल्याची घटना समाेर अाली अाहे.

पुणे : खडकवासला धरणाच्या माेऱ्यांच्या समाेरील एका पुलाजवळ पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवायला गेलेले तरुणच पाण्यात अडकून पडल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना सुखरुप पाण्याबाहेर काढले. भूतदया म्हणून कुत्र्याचा जीव वाचावयलाा गेलेल्या तरुण स्वतःचाच जीव अडकवून बसले.

    रविवारी सकाळी अाठच्या सुमारास अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला खडकवासला धरणाच्या मोऱ्यांच्या पुढे एका छोट्या पुलाच्या ठिकाणी किनाऱ्याला जवळपास पंचवीस फुट खोलीवर एक जिवंत कुत्रे पडले असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाकडून लगेचच सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना करण्यात आले. जवानांनी पोहोचताच पाहिले तर परिस्थिती वेगळीच दिसली. घटनास्थळी तीन तरुण खाली अडकल्याने जवळच एका दगडावर उभे असून चोहोबाजूंनी पाण्याचा प्रवाह असल्याचे दिसून अाले. सकाळी हे तरुण नावे महेबूब विजापुरकर(२०),अजय मराठे(२४), सचिन यादव(२४)  सर्व राहणार वारजे माळवाडी, हे तरुण खडकवासल्याला  फिरायला आले असताना त्यांना एक कुत्रे खाली पडल्याचे दिसले. त्यांनी एका टेम्पो चालकाला थांबवून दाेरीच्या मदतीने खाली उतरुन कुत्र्याला सुखरुप वर पाठवले. जिगरबाज काम तर झाले खरे पण नंतर दाेरीच्या मदतीने या तरुणांना वर येणे शक्य होईना. सदर माहिती जवानांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळवून अग्निशमन वाहनावर असलेली “एक्स्टेंशन लॅडर” वापरुन या तीनही तरुणांना दहा मिनिटातच सुखरुप बाहेर काढले.

तरुणांचे मुक्या प्राण्याविषयी असलेले प्रेम व धाडस याचे कौतुक तिथे सर्वांनी केले. तसेच सिंहगड अग्निशमन केंद्रांचे वाहन चालक गणेश ससाणे व जवान शिवाजी आटोळे, विलास घडशी, प्रमोद मरळ यांचे ही सर्वांनी व या तीन तरुणांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलnewsबातम्याDamधरण