तळेगाव चौकात तीन वाहनांचा अपघात, तीन तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:10 IST2021-04-27T04:10:40+5:302021-04-27T04:10:40+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल सोनवणे (वय २७), अक्षय सोनवणे (वय २३, दोघेही रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) ...

तळेगाव चौकात तीन वाहनांचा अपघात, तीन तरुण जागीच ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल सोनवणे (वय २७), अक्षय सोनवणे (वय २३, दोघेही रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) व अविनाश रोहिदास अरगडे (वय २८, रा. कडूस, ता. खेड, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
शिक्रापूर बाजूकडून तळेगाव बाजूकडे जाणारा कंटेनर (एम एच ०४ एफ यू ०१९१) व चौकात उभ्या असलेल्या कार (एम एच १४ ईयू ३३२६) ला भोसरीकडून राजगुरूनगरच्या बाजूला भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची (एम एच १४ ईपी ४३२१)जोरदार धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहनातील तीनजण जागीच ठार झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड हे पुढील तपास करीत आहेत.