शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धूळ कमी करण्यासाठी तीन ट्रक करणार पाण्याची फवारणी;स्थायी समितीची मान्यता

By राजू हिंगे | Updated: December 14, 2024 12:39 IST

शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे.

पुणे : शहराच्या विविध भागांत विकासकामे आणि नवीन बांधकामांमुळे धोकादायक धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २ लाख रुपये खर्च करून घेतलेले तीन ट्रक गेल्या तीन वर्षांपासून विनावापर पडून होत्या. अखेर हे ट्रक पाणी फवारणी करून धूळ कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या ८४ लाख ९० हजार रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शहरात बांधकाम प्रकल्प, महापालिकेचे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी रेडीमिक्स, खडी, माती यांची वाहतूक करणारी वाहने रस्त्याने धावत आहेत. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे.नागरिकांना या धुळीचा त्रास होत आहे. केंद्र सरकारने पुणे महापालिकेला राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी निधी दिला आहे. त्यातून ही वाहने खरेदी केली होती.

शहरातील धुलिकणांचे प्रमाण अधिक असलेले कात्रज-कोंढवा रस्ता, खराडी येथील आयटी पार्क रस्ता, तसेच हांडेवाडी ते फुरसुंगी कचरा डेपो समोरील रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामध्ये १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पादचारी मार्ग, दुभाजक असे एकूण ४० किलोमीटर अंतरात ही यंत्रणा वापरली जाईल. या वाहनासोबत सात हजार लिटर क्षमतेचा टॅंकर असून, टँकरच्या समोरच्या बाजूस चार ठिकाणांवरून फवारणी होईल. त्याचप्रमाणे ट्रकच्या डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येकी दोन आणि गाडीच्या वरच्या बाजूने दोन्ही बाजूस प्रत्येकी चार अशा १६ ठिकाणांवरून पाणी फवारणी होईल.या पाण्याच्या फवारणीमुळे हे धुलिकण पाण्यासोबत खाली येतील. सुमारे दोन वर्षे ही वाहने वापरली जाणार आहे. त्यासाठी ८४ लाख ९० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र