शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्ह्यातील साडेतीन हजार दिव्यांग रोजगाराच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:00 IST

केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने २९ मे रोजी मंजुरी दिली.

ठळक मुद्देकौशल्य रोजगार विकास : सरकारी पदांचाही अनुशेष, खासगी नोकऱ्याही मिळेनातकुष्ठरोग बरा झालेले, अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्याचा समावेश

पुणे : सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा अनुशेष भरला जात नसून, त्यांना खासगी नोकऱ्यांमधेही रोजगार मिळविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातच दिव्यांगांची रोजगार प्रतिक्षा यादी साडेतीन हजारांवर पोहचली आहे. त्यात कुष्ठरोग बरा झालेले, अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने २९ मे रोजी मंजुरी दिली. अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, शरीरिक वाढ खुंटणे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार अ ते ड श्रेणीतील पदांमधे ३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २ मे १९९८ रोजी घेतला होता. राज्यात तीन टक्के नुसारच रिक्त पदांचा अनुशेष भरणे राज्य सरकारला अजून शक्य झालेले नाही.

तब्बल सात हजार सरकारी जागा रिक्त आहेत. त्याचा चार टक्के नुसार पदभरतीचा अनुशेष लक्षात घेतल्यास त्यात आणखी वाढ होईल. एकीकडे सरकारी नोकर भरती होत नाही. दुसरीकडे खासगी नोकºयांतही पुरेशी संधी मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामधे ४ जुलै अखेरीस विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या ३ हजार ४९५ बेरोजगारांची नोंद आहे. त्यात सर्वाधिक २ हजार ३३२ अस्थिव्यंग असून, तीन जण कुष्ठरोग बरा झालेले दिव्यांग आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालक अ. उ. पवार यांनी दिली. --जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांगांची असलेली नोंद अंध- ५८८             मूकबधिर- ५६०अस्थिव्यंग- २३३२ श्वसनाचे विकार- १२कुष्ठरोग बरा झालेले - ३एकूण                ३,४९५--सरकारी नोकरीचा हजारो जागांचा अनुशेष भरला जात नाही. केवळ जिल्ह्यातच हजारो बेरोजगार तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. कायद्यानुसार बेरोजगार दिव्यांगांना बेरोजगार भत्ता देणे बंधनकारक आहे. असा भत्ता दिला जात नाही. सुशिक्षित बोरोजगार व्यक्तींचा आढावा घेऊन भत्ता सुरु करावा.- हरिदास शिंदे, अपंग हक्क सुरक्षा समिती, अध्यक्ष 

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगGovernmentसरकार