शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील तरुणाच्या खूनप्रकरणी तीन संशयित ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:14 IST

येरवडयातील खूनप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देराहुल कांबळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

विमाननगर : येरवडयात अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. या खूनप्रकरणीपोलिसांनी तीन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी गुरुवारी (दि. २३ऑगस्ट ) ताब्यात घेतले. खून झालेल्या निहाल लोंढे याचे वडील जनार्दन लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास निहाल जनार्दन लोंढे (वय १९ रा. भीमक्रांती मंडळाजवळ लक्ष्मीनगर येरवडा) हा त्याचा मित्र राहुल कांबळे यांच्यासह बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला होता. रात्री दहा वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वडील जनार्दन व मेहुणे नागेश कांबळे हे पर्णकुटी पायथाकडे निहाल व  राहुल कांबळे याला अनोळखी तीन ते चार इसम धारदार शस्त्राने मारत होते. या घटनेत निहालचा जागीच मृत्यू झाला तर राहुल गंभीर जखमी झाला. दरम्यान, या घटनेमुळे गुरुवारी रात्री ससून रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताबयात घेणार नाही अशी भूमिका निहालच्या नातेवाइकांनी घेतली होती. मात्र, रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुरुवारी सकाळी निहालचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.येरवडा स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता निहालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निहालच्या घरापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासासाठी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने तीन संशयित हल्लेखोरांना गुरुवारी ताब्यात घेतले. या गंभीर घटनेतील जखमी राहुल कांबळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत .

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिसMurderखून