२६ जानेवारीच्या दिल्ली संचलनासाठी पुण्यातून तिघींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:56+5:302021-01-08T04:32:56+5:30
पुणे : दिल्ली येथे २६ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी (एनआरडी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्यार्थिनींची आणि ...

२६ जानेवारीच्या दिल्ली संचलनासाठी पुण्यातून तिघींची निवड
पुणे : दिल्ली येथे २६ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी (एनआरडी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्यार्थिनींची आणि संघनायिका म्हणून एका प्राध्यापिकेची निवड झाली आहे. सध्या सर्व विद्यार्थिनी दिल्लीत संचलनाचा सराव करत आहेत.
सावित्रीबाई पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विद्यार्थी प्रजासत्ताक दिन संचलनात आपली निवड व्हावी यासाठी तयारी करतात. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही. मात्र, यंदा पुणे विद्यापीठाच्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयाची राजश्री माने, नाशिकमधील केएसकेडब्ल्यू महाविद्यालयाच्या ज्योत्स्ना कदम आणि अहमदनगर जिल्ह्यातील महिला होम सायन्स आणि बीसीए महाविद्यालयाच्या सायली चहानकर या तीन विद्यार्थिनींची ‘एनआरडी’साठी निवड झाली. नवजीवन विधी महाविद्यालयाच्या एनएसएस कार्यक्रम अधिकारी शालिनी पेखले यांना संघ नायिका म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
एनआरडीसाठी महाराष्ट्रातील ‘एनएसएस’च्या १४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात मॉडर्न महाविद्यालयाची विद्यार्थी मृणाल पवार आणि संगमनेर महाविद्यालयाची विद्यार्थी अनुजा कासार यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस सोनार याचेही नाव प्रतीक्षा यादीत आहे.
चौकट
दिल्ली संचलनात महाराष्ट्र
एनएसएसच्या एनआरडीसाठी निवड झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची नावे अशी - मनोज जगदाळे (बीड), प्रतीक कदम (नंदूरबार), प्रतीककुमार राय (मुंबई), सुदर्शन खिलारे (औरंगाबाद), सतीश देवासी (रत्नागिरी), रोहित रायसिंग (जळगाव), प्रगती शेट्टीगर (डोंबिवली).