शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

एरंडवणे भागात भरधाव महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडवले; एकीची प्रकृती गंभीर

By नम्रता फडणीस | Updated: November 4, 2023 18:46 IST

Pune Accident News: रंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावर भरधाव वेगातील महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

- नम्रता फडणीसपुणे - एरंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावर भरधाव वेगातील महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या अपघातात तीन मुली गंभीर झाल्या. त्यातील एक मुलगी कारच्या खाली सापडली. तिला सुखरूप बाहेर काढले पण तिची प्रकृती गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. महिला चालकावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कोथरुडमधील निंबाळकर बागेकडून भरधाव वेगात महिला कारचालक एरंडवणे भागातील गणेशनगरकडे निघाली होती. शाळकरी मुली पदपथावरुन चालल्या  होत्या. गुळवणी महाराज रस्त्यावर रिव्हाइव्ह केअर अँड ब्युटी स्टुडिओ या दुकानासमोर चालक महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले. मोटार पदपथावर शिरली. पदपथावरुन निघालेल्या तीन मुलींपैकी दोघी फेकल्या गेल्या. एक मुलगी कारखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मुलगी कारखाली सापडून ही महिला कारमध्येच बसून होती. मी वेगात कार चालवत नव्हते असे ती रडून सांगत होती. अपघातानंतर नागरिकांनी तिघींना तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना कळविण्यात आली. अपघातानंतर मोटार चालक महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात