शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-मुंबई महामार्गावर हवालाचे ४५ लाख रुपये लुटणारे तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By विवेक भुसे | Updated: February 17, 2024 10:51 IST

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली....

पुणे : नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस दलातील तिघा कर्मचार्‍यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली.पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते सर्व जण दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना ८ मार्च २०२२ रोजी सकाळी हा प्रकार घडला होता. तिघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

गणेश कांबळे याला बाबुभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे औरंगाबादमधून नाशिक मार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याने गणेश शिंदे आणि दिलीप पिलाणे यांच्याशी संगनमत करुन भिवंडीजवळील दिवे गावात हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडविली. पोलिस असल्याचा धाक दाखवून वाहनाची तपासणी करुन कारवाई करण्याची भिती दाखवून गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन त्यांना तेथून हाकलून दिले होते. जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन सीक पास मिळविला.

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडी येथे जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही म्हणून  साप्ताहिक सुट्टी घेतो, असे खोटे कारण दाखवून सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी