पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक, तीनजण गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:31 PM2022-04-28T12:31:17+5:302022-04-28T15:20:06+5:30

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

three persons were seriously injured when st hit them due to brake failure in pune city | पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक, तीनजण गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनांच्या रांगा

पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक, तीनजण गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनांच्या रांगा

googlenewsNext

धनकवडी (पुणे) :धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलवरून जाणाऱ्या एस. टी. बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने उड्डाणपूलावरुन जाणाऱ्या एका चारचाकीसह, सहा ते सात दुचाकींना धडक दिली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सातारा - स्वारगेट बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) ही सातारा येथून सकाळी पुण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता एसटी बस धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलावरुन जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला हँन्ड लाँक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान बालाजीनगर परिसरात कायम गर्दी असते. त्यामुळे उड्डाणपूलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सहकारनगर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी क्रेनच्या साह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: three persons were seriously injured when st hit them due to brake failure in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.