शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 20:52 IST

गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महानगरपालिका व्हेईकल डेपोजवळील श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे घडली.     बबलू लालसाहब पितळे (वय ३३, रा. हनुमान नगर,कात्रज), परशुराम बसप्पा होसमनी (वय ३७, रा. गुलटेकडी) आणि राहुल रेवनआप्पा ढोणे (वय १९, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई डी. डी. रणसिंग यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी रणसिंग व त्यांचे सहकारी बीट मार्शल ड्युटी करताना श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे मंडळ तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपी आणि मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी फियार्दींना धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याने मंडळातील तिघांना पोलिसांनी अटक केली. उपनिरीक्षक आर. आय. उसगावकर तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस