शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

डीएसकेंच्या जावयासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 21:05 IST

डीएसकेंच्या व्यवहाराच्या अनेक बाबी जावई केदार वांजपे यांना माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची फसवणूक : व्यवहारातील अनेक बाबींची माहितीआर्थिक कारणावरुन वाद झाल्याने ते २००९ साली केदार वांजपे डीएसके यांच्यापासून वेगळे काही हजार पानांचे हे आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर करण्याची शक्यता

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी यांच्या जावयासह तिघांना पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे़. केदार वांजपे, सई वांजपे आणि वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर अशी त्यांची नावे आहेत़. डी़एस़के आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डी़ एस़ कुलकर्णी यांचे जावई केदार वांजपे हे पूर्वी त्यांच्याकडे कामाला होते़. त्यांना त्यांच्या व्यवहाराच्या अनेक बाबी माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़. त्यांना यातील अनेक व्यवहारांची माहिती आहे़. तसेच, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपनीतील २००७ -०८ पासून जमिनीचे सर्व प्रमुख व्यवहार धनंजय पाचपोर हे पाहत होते़. त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये पाचपोर यांचा महत्त्वाचा वाटा आहे़. त्यांच्या उद्योग-व्यवसायामधील प्रमुख सूत्रधार पाचपोर यांचा असल्याचे सांगितले जाते़. या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते़. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतरही त्यांच्याकडून माहिती दिली जात नसल्याने पोलिसांनी त्यांना सायंकाळी अटक केली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली़. केदार वांजपे हे डीएसके यांच्या भावाचे जावई आहेत़. केदार आधी डीएसके यांच्या समवेत काम करत होते़. ड्रीमसिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती़. आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने ते २००९ साली ते डीएसके यांच्यापासून वेगळे झाले़. आर्थिक अडचणीत आल्यानंतर डी़ एस़ कुलकर्णी यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आमच्याच नातेवाईकांनी अडचणीत आणले़ असे म्हणत केदार वांजपे यांच्यावर कंपनीतील माहिती माझ्या विरोधकांना पुरविली़. गुंतवणुकदारांच्या बैठकीतील संभाषणापैकी डीएसके यांचे दीड हजार रुपयांचे चेक परत जातात़ पत्नीला मुर्ख म्हणालो, असा व्हिडिओ काटछाट करुन व्हायरल केला़. त्यामुळे अफवा पसरुन आमच्या अडचणीत वाढ झाली, असे सांगितले होते़. त्यानंतर केदार वांजपे यांनी डीएसके यांनी जाहीर माफी मागावी, नाही तर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते़. आता पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही अटक केली आहे़. डी़ एस़ कुलकर्णी यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात सध्या आर्थिक गुन्हे शाखा आरोपपत्राची तयारी करत असून काही हजार पानांचे हे आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक