शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाळ्यात गाडी घुसून तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:53 IST

गाडी शिकत असताना त्यावरील नियंत्रण सुटल्याने मार्केट यार्डमधील गाळ्यात घुसलेल्या एक वाहनाने मोटार व तीन दुचाकींना धडक दिली़ या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत़ ही घटना छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील गाळा क्र. ६६०मध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली़

महर्षीनगर : गाडी शिकत असताना त्यावरील नियंत्रण सुटल्याने मार्केट यार्डमधील गाळ्यात घुसलेल्या एक वाहनाने मोटार व तीन दुचाकींना धडक दिली़ या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत़ ही घटना छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील गाळा क्र. ६६०मध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली़या घटनेत आसिफ बागवान, इम्तियाज बागवान, कप्तान ऊर्फ नसीर बागवान हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेची माहिती समजताच तेथे मोठी गर्दी झाली होती़ मोटारचालक आसिफ शेख (वय २७, रा़ कोंढवा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ आसिफ शेख हा मूळचा भिवंडी येथील राहणारा असून, सध्या कोंढव्यात राहतो़ तो त्याच्या सासºयाकडे आला होता़ तो मार्केट यार्डामध्ये फोर्ट आॅयकॉन ही मोटार शिकत होता़ अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची मोटार तेथे असलेली मोटार व तीन दुचाकी यांना धडक देऊन थेट गाळा क्र. ६६०मध्ये घुसली़ त्यात गाळ्यावरील तीन जण गंभीर जखमी झाले़ येथील कामगारांना जेवणाचे डबे पुरविणारे डबेवाले बडदे यांची दुचाकीही तेथेच उभी होती़ तिचे मोठे नुकसान झाले़ ही घटना घडताच तेथे मोठी गर्दी जमली़ मार्केट यार्ड पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ लोकांनी मोटारचालक शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण चोरबेले हे वाहतूक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे मार्केट यार्डाचे गेट उघडे असल्यामुळे इतर वाहने आत येऊन अपघात होत आहेत, असे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले. वाहन चााक आसिफ शेख याला मार्केट यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात